पोलीस स्टेशन अनसिंग यांची अवैध जनावरे वाहतुक विरूध्द धडक कारवाई

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन
वाशिम जिल्हयातील अवैध जनावरांची वाहतुक विरूध्द धडक मोहिम हाती घेऊन वाशिम जिल्हयातील अवैध प्राण्याची वाहतुक करणा-या लोकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


त्याचाच एक भाग म्हणुन मा पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात परत एकदा वाशिम जिल्हातील अवैध जनावरांची वाहतुक करणा-या इसमाविरूध्द विशेष मोहिम सुरू केली आहे. सदर मोहिमे अंतर्गत दि.02.03.2022 रोजी पोलीस स्टेशन अनसिंग येथे मिळालेल्या गोपनिय
माहितीव्दारे अनसिंग ते वारला रोडवर एक टेम्पो क्र MH 38 X 0851 या वाहनातुन 06 गोवंश जनावरे
(गोरे) अवैधरित्या घेऊन जात असतांना मिळुन आला त्यास ताब्यात घेऊन त्याचेवर कलम 279 भादवी व कलम 11 (1) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून वाहन व जनावरे असा एकुण 5,60, 000 /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर श्री यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन
अनसिंगचे ठाणेदार श्री प्रशांत कावरे यांचे नेतृत्वात तसेच पोलीस उपनिरीक्षक रविद्र ताले, पोकॉ माणिक जुंगाडे व मधुकर देसाई यांनी केली सदर कार्यवाहीमुळे अनसिंग शहरातील जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!