प्रतिनिधि ज़हीद खान
आष्टी (शहीद):- मध्यप्रदेशातील पचमढी येथे महाशिवरात्रीनिमित्त वर्धा येथील आष्टीमधील भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी जाताना कारचा अपघात झाला.यामध्ये तीन युवक जागीच ठार झाले. 1) तुषार ज्ञानेश्वरराव झामडे वय 30 वर्ष, रा.आबाद किन्ही ता.आष्टी (शहीद), 2) दीपक भाऊरावजी डाखोरे, वय 30 रा. आष्टी (शहीद), 3) अक्षय गौरखेडे, वय 26 रा. तिवसा, जि. अमरावती

दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी मृतक तुषार झामडे याने आपल्या कारने तीन मित्रासह पचमडी ला जाण्याचा कार्यक्रम ठरविला. सायंकाळी 6 वाजता आष्टी वरून पचमडी कडे रवाना झाले. पचमडीच्या काही अंतरावर पोहोचण्या आधी मध्यरात्री 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांची कार वळणावरील एका भिंतीला धडकली.
यावेळी कार चार वेळा पलटी झाली. यामध्ये तिघे जण जागीच मृत्यू पावले. असून त्याचा एक मित्र यामधून सुदैवाने बचावला. घटनेची माहिती आष्टीला पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अपघातात गाडीच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे.


