अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
अमरावती वार्ता :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा फाट्यावर रविवार दिनांक २७ फेब्रवारी ८ वाजताच्या सुमारास दुचाकी व टाटा एस चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. दुचाकी व चारचाकीत अमोरा समोर धडक झाली. या धडकेत एक युवक जागीच ठार झाला असून दोन युवक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे भरती करण्यात आले होते परंतु जखमींची नाजूक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविले.

युवा स्वाभिमान पार्टीचे अजय देशमुख, शेख मतीन, सुलतान सौदागर, यांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती केले आहे. अपघातात जागीच ठार झालेला युवक कोकर्डा येथील गौरव गायकी वय १६ वर्ष रा. दर्यापूर व जखमी त्याच्यासोबत असलेले प्रज्वल तायडे वय १६ वर्ष रा. अमरावती, व गौरव इंगळे ,वय १८ वर्ष राहणार कोकर्डा, नेरपिंगळाई, हे गंभीर जखमी असून त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नुकताच एका दिवशी झालेले अंजनगाव अकोट महामार्गावर ट्रॅव्हल्स व आयशर, मॅक्सीमो व दुचाकी, दुचाकी व बैलगाडी यांच्यात झालेला अपघात ताजे असताना आज दर्यापूर रस्त्यावरील कोकर्डा फाट्यावर भीषण अपघात झाला. अंजनगाव अकोट, अंजनगाव परतवाडा, अंजनगाव दर्यापूर या महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका वाढत आहे, तरी प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहेत.
