चांदूर रेल्वे प्रतिनिधी सुभाष केाटेचा :-
चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील दलित बांधवावर गावातील सवर्ण सतत जातीय अन्याय अत्याचार करीत आहे.त्यांच्या निषधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवारी सकाळी (ता.२२) गाव सोडले असुन त्यांचा मुक्काम गावालगतच्या पाझर तलावावर असुन ते गावात परतणार नाही.त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी कळविले आहे.

दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे.याच शिवारात मुख्य सरकारी पांदनच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे.मात्र गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला.त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली.ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.या प्रकरणी चौघांवर अॅट्रोसिटीसह अन्य गुन्हे दाखल झालेले आहे.मात्र स्थानिक एसडीपीओने सदर प्रकरणच दाबुन टाकले.
