दर्यापूर – महेश बुंदे
महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या ईडी अटकेविरोधात दर्यापूरमध्ये (दि. २५) शुक्रवारी गांधी चौक येथे कुत्र्याच्या गळ्यात ईडीचे फलक बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तरुणांसह जेष्ठांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
