पुणे जिल्ह्यातील कार्यरत असणा-या आधिकारी वर्गाची पदोन्नती ; महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे वतीने सन्मान

चिंबळी दि २५( वार्ताहर सुनील बटवाल )  पुणे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदी कार्यरत असणा-या मा.सौ.संध्या गायकवाड यांची शिक्षणाधिकारी पदी नुकतीच पदोन्नती झाली व त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेतच प्राथमिक विभागात शिक्षण आधिकारी म्हणून नियुक्ती करणेत आल्याने महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे वतीने राज्य अध्यक्ष गौतम कांबळे राज्यकार्यअध्यक्ष चंद्रकांत सलवदे हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड आदि पदाधिकारीचे वतीने पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी आधिकारी मा.आयुष प्रसाद यांचे हस्ते  मा.संध्या गायकवाड यांचा सन्मान करणेत आला.

तसेच दौंड तालुका गटशिक्षणाधिकारी पदी कार्यरत असणारे मा.नवनाथ वणवे यांची देखील शिक्षण निरीक्षक म्हणून बृहमुंबई येथे नियुक्ती झाल्याने त्यांचा ही सन्मान करणेत आला तसेच खेड तालुक्यात अगदी उपशिक्षक पदावरून गटशिक्षणाधिकारी व अता शिक्षण आधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड येथे नियुक्ती झालेले संजयजी नाईकडे तसेच खेड तालुक्यातील अगदी माजगाव कुरूळी अशा द्विशिक्षकी शाळेत आपल्या उपशिक्षक पदावरून नौकरीस सुरवात करणारे मा.भाऊसाहेब कारेकर यांची देखील शिक्षणाधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषद येथे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आल्याने तसेच पुणे जिल्हा परिषद येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्य केलेले पोपटराव महाजन यांची देखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे सहायक संचालक म्हणून नियुक्ती झाली

अशा सर्वच पुणे जिल्ह्यातील कार्यरत असणा-या आधिकारी वर्गाची पदोन्नती झालेने सर्वच आधिकारी मान्यवरांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे वतीने पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करणेत आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन करणेत आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!