प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि २५(वार्ताहर) श्री अडबंडगनाथ महाराजांच्या उत्साहा निमित्ताने डुडूळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

डुडूळगाव येथे अडबंडगनाथ महाराजांच्या उत्साहा निमित्ताने मंदिराला विद्युत रोषणाई करुन भव्य मंडप उभारण्यात आला होता या निमित्ताने बुधवार दि २३रोजी पहाटे ५वा काकड आरती महापुजा व अभिषेक करून तर सकाळी १०वा महाप्रसाद व सायंकाळी ७वा ३०मि महाआरती करून सायंकाळी ८वा पालखी मिरवणूक काढून १०वा करमणूकीसाठी आर्केष्टा ठेवण्यात आला होता.

तर गुरूवार दि २४रोजी सकाळी आॅक्रेष्ट्राचा हजेरीचा कार्यक्रम आयोजित करून दुपारी ४ वा भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कुस्ती स्पर्धेसाठी खेड हवेली मावळ मुळशी शिरूर तालुक्यातील सुमारे १००मल्ल उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवली होती
स्पर्धेसाठी १००रुपाया पासून ते १० हजार रुपये व एक चांदीची गदा बक्षिस ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .
