पिंपरी चिंचवड | छत्तीसगडी गाण्याचे अल्बम व स्टेज शो मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व इतर २ मुलींकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दलालांवरती सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पिंपरी चिंचवड वार्ता :- “सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने छत्तीसगडी गाण्याचे अल्बम व स्टेज शो मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री व इतर २ मुलींकडुन जबरदस्तीने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दलालांवरती कारवाई केलेबाबत मिळालेल्या माहितीनुसार “

मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश • दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक है पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २३/०२/२०२२ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींकडुन वेश्याव्यवसाय करुन घेणा-या तसेच छत्तीसगड अभिनेत्रीस • जास्त पैशाचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या दलालांवर कारवाई करण्यात आली आहे.

पहा कारवाईचा व्हिडिओ

दिनांक २३/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई-पुणे हायवेलगत ताथवडे, पुणे येथील सुप्रसिद्ध लॉजवर हेमंत व विकी बनावट नावाचे दोघे दलाल त्यापैकी एक १) जितेंद्र हस्तीमल बोकाडीया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी २) हेमंत प्रणाबंधु साहु हे त्यांचे इतर साथीदार ३) मुकेश केसवाणी ४) करण ५) युसुफ शेख उर्फ लंगडा यांचे सांगणे वरुन अनुक्रमांक एक व दोन हे त्यांचे मोबाईल वरुन व्हॉट्सअॅप कॉल करुन वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवुन देतात त्या मुली त्यांचे नावावरती रुम बुक करुन ठेवतात अशी माहिती मिळाली होती.

अशा मिळालेल्या माहितीवरून बनावट ग्राहक पाचारण करुन पडताळणी करीता मुंबई-पुणे हायवेलगत, ताथवडे, पुणे येथील सुप्रसिध्द लॉजवर पाठवुन सापळा रचुन छापा टाकुन आरोपींचे ताब्यातून एकुण ०३ पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. सदर पिडीत मुलीमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री असून इतर दोन पैकी एक राजस्थान व एक मुंबई येथील आहेत. आरोपीच्या ताब्यातुन जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

१) १०,०००/- रु रोख रक्कम ,२) ९,५००/-रु.कि.चे दोन मोबाईल,३) १००/-रु.किं. चे इतर साहित्य असा एकुण १९,६००/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला आहे.

यात आरोपी १) जितेंद्र हस्तीमल बोकाडीया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी वय ४८ वर्षे रा. सध्या ओझर अपार्टमेंट रुम नंबर २१६ दुसरा मजला वाघोली पुणे मुळ रा. राणी स्टेशन जिल्हा पाली राजस्थान २) हेमंत प्रणाबंधु साहु वय ३२ वर्षे मुळगांव कुसुमुंडिया, दासीपुर, पंगातिरा डिंगालाल परांगजाल राज्य उडिसा सध्या रा क्लासिक हॉटेल टोयटा शोरुम समोर, पुणे नगर रोड वाघोली पुणे. तसेच फरार आरोपी ३) मुकेश केशवाणी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) रा. पिंपरी चिंचवड ४) करण (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) ५) युसुफ ऊर्फ लंगडा शेख (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांचे विरुध्द वाकड पोलीस स्टेशन गुरनं १४७/२०२२ भादवि कलम ३७०, (३), ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४.५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. अटक आरोपी क्रमांक १ व २ यांना दिनांक २७/०२/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असुन पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे.

कारवाई दरम्यान केलेल्या चौकशी अंती असे उघडकीस आले की, एका मुलीची वेश्यागमनासाठी निवड करण्यास सांगुन एका ग्राहकाकडुन एका वेळेचे १०,०००/- रु ते १५,०००/- रुपये, एका दिवसाचे २०,०००/- ते (३५,००० /- रुपये, एका रात्रीचे २०,०००/- ते ४०,००० /- रुपये घेत असत व ग्राहकाकडून मिळालेल्या रक्कमेतून प्रति ग्राहक फक्त १,५००/- ते २,०००/- रुपये मुलींना देवुन त्यांचेकडून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवण्सास भाग पाडत होते.

आरोपी जितेंद्र व हेमंत हे मुलींकडुन वेश्याव्यवसायातून मिळवलेली रक्कम घेवून जाण्यासाठी मुंबई-पुणे हायवेलगत, ताथवडे पुणे लॉजजवळ आले असता सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

यातील आरोपींवर दाखल गुन्हे १) जितेंद्र हस्तीमल बोकाडीया ऊर्फे हितेश हस्तीमलजी ओसवाल ऊर्फ महेश ऊर्फ विकी याचेवरती विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापुर शहर गु.र.नं ५४७/२०१७ भादवि ३७०. (२) (३)अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४.५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

२) हेमंत प्रणाबंधु साहु याचेवरती १) येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं ८८०/२०१९ अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४.५ प्रमाणे २) लोणीकंद पोलीस स्टेशन ८४७/२०१९ पोव्ही अॅक्ट ६५ ई प्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत.

३) युसुफ शेख उर्फ लंगड़ा याचेवर चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं १३८/२०२१ भादवि ३७० अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३.४.५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची दमदार कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ संजय शिंदे मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. काकासाहेब डोळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पो.उपनि श्री. प्रदिपसिंग सिसोदे, पो.उपनि श्री धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, अमोल साडेकर, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सुमित डमाळ, अतुल लोखंडे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेशमा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!