पुणे :- प्रत्येक गावाची सामाजिक सुरक्षेबरोबरच शातंता ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे अंग असताना रासे गावचे पोलिस पाटिल पद रिक्त आहे तर तंटामुक्ती अध्यक्ष पदही रिक्त आहे. त्यामुळे गावातील शांतता, कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी ही दोन्ही पदे नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बकालपणा वाढत्या नागरीकरणामुळे वाढल्याचे दिसत आहे. गावच्या कारभारात पोलीस पाटील हे पद देखील महत्वाचा आधार असतो.मात्र गेली अनेक वर्षापासून रासे गावचे पोलीस पाटील पदच रिक्त असल्यामुळे गावात सामाजिक सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
रासे गाव हे चाकण शिक्रापूर रस्त्यावर आहे. चाकणपासुन हाकेच्या अतंरावर असल्यामुळे गावाचे गावपण आता कमी होऊन बाहेरील नागरिकांनी,चाकरमानी जमीन खरेदी करून स्थायिक झाले आहेत.तर काही भाड्याने रुम घेऊन राहात आहे.त्यामुळे रासे गावची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे.चाकण औद्योगिकरणामुळे परिसरातील गावांचा जसा कायापालट होऊन वाढत्या नागरीकरणामुळे आता चाकण सभोवतालच्या दहा पधंरा किलोमीटर अतंरावरील परिसरातील गावांतील चाकरमान्यांमुळे,पर राज्यातून आलेल्या नागरिकांमुळे लोकसंख्या देखील वाढली आहे.
याचा परीणाम मुलभुत सोयी सुविधावर ताण पडला तसाच कायदा सुव्यवस्थेवर पडताना दिसत आहे. बाहेरून आलेले गुन्हेगार, कामगार वर्ग,पर राज्यातील नागरिक यांचे मोठे वास्तव्य वाढले आहे. गावाचे गावपण आता हरवू लागले आहे. गावांमधील गुंडगिरी, खुन, दरोडे, खंडणीसाठी मारामाऱ्या,महिलांना शिवीगाळ, छेडछाड,बलात्कार आदी गैरप्रकारासह प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे गावातील शांतता,सलोखा, टिकण्याऐवजी भांडणे,हाणामाऱ्या गुन्हेगारीचा चढता आलेखच पाहायला मिळत आहे.
रासे गावातील पोलीस पाटलाने राजीनामा दिल्याने ते पद गेली अनेक वर्षे रिक्त आहे.त्यामुळे गावाला पोलीस पाटील पदच नसल्यामुळे ग्रामस्थासह नागरीकांना चाकण पोलिस स्टेशनला धाव घ्यावी लागत आहे.दरवर्षी आँगस्टमध्ये ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा तिढाच सुटत नसल्याने तंटामुक्ती अध्यक्ष पदही रिक्तच आहे. याचा परिणाम गावातील नागरिकांसह ग्रामस्थांना आणि अन्याय झालेल्या महिलांना भोगावा लागत आहे.साहजिकच आपले गा-हाणे घेऊन न्यायासाठी पोलीस स्टेशनला जाऊन दाद मागावी लागत आहे.
गेल्या जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षभरात चाकण पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र 3, अदखलपात्र 38 , दारूबंदी 7, व इतर 4 असे एकूण ५२ दखल,अदखलपात्र गुन्हे नोंदले आहे. ही तक्रांरीची आकडेवारी पाहता गावात शांतता, सुव्यवस्था सुरळीत राहण्याऐवजी भांडणे,हाणामा-या गुन्हेगारी,गुंडगिरी, महिलांना शिवीगाळ, गटातटाचे वाद विवाद वाढु लागल्यामुळे नागरिकांसह,महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महसुल प्रशासनाने रिक्त पोलिस पाटिल पद भरुन. गावपातळीवर तंटामुक्ती अध्यक्षाबाबत चाकण पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत निर्णय घेऊन रासे गावाची होणारी घुसमटीचा निपटारा करण्याची मागणी गावातील नागरिकांमधुन केली जात आहे.