प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९९५ पासून राबविण्यात येत आहे. सन २०२२ या वर्षात २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या ग्रामीण भागात ८६,०६४ आणि नागरी भागात ३५,२०४ अशी एकूण १ लाख २१ हजार २६८ आहे.त्यासाठी ग्रामीण भागात ८३१ आणि नागरी भागात १३० असे एकूण ९६१ पल्स पोलिओ लसीकरण बूथ राहणार आहे.
बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५९ आणि नागरी भागात ३८२ असे एकूण २५४१ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.ही मोहीम प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविण्यासाठी १६८ व शहरी भागासाठी २६ असे एकूण १९४ पर्यवेक्षक नियुक्त केले आहे.
