अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
अंजनगाव अकोट महामार्गावरील लखाड फाट्या समोर आयशर व ट्रॅव्हल्स मध्ये आज गुरुवार दिनांक २४ फेब्रवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अंजनगाव-अकोट,अंजनगाव- दर्यापूर, अंजनगाव-परतवाडा या राज्य महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका वाढली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. जेव्हा पासून सदर रस्ता नूतनीकरण करण्यात आला तेव्हा पासून अपघातात वाढ झाली आहे. अशातच आज अंजनगाव अकोट महामार्गावर ट्रॅव्हल्स व आयशर मध्ये अपघात झाला.

अंजनगाव वरुन वाहक भरून अकोट कडे निघालेल्या ट्रॅव्हल्स क्रं.एम एच २७ ए ९४३९ ला. अकोट कडून विरुध्द दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर क्रं.एम एच ४० आर एफ ७२३० याने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की,या धडकेत एक ४८ वर्षीय अज्ञात इसम जागीच ठार झाला आणि एका इसमाचा हात घटना डोपरा पासून कटला आहे तर ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
