प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील एका रास्त दुकानदाराला शुल्लक कारणावरुन झालेल्या बाचाबाचीनंतर मारहान करण्यात आल्याचा प्रकार घडला असुन सबंधितांवर कायदेशिर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेकडुन विविध प्रशासकीय स्तरावर निवेदन सादर करण्यात आले आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यांनी लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमुद असे की, दिनांक २१/०२/२०२२ रोज सोमवार ला सकाळी अंदाजे ९.०० वाजता मंगरुळपीर वार्ड क्रं. ०२ मधील शासकीय रास्त भाव दुकानामध्ये दुकानदार जयंत रमेश कुळकर्णी यांना मंगरुळपीर येथील अब्दुल रज्जाक अब्दुल जब्बार व इतर तिन ते चार व्यक्तींनी वाद घालुन जबर मारहाण केली त्यामुळे रास्त भाव दुकानदार जयंत रमेश कुळकर्णी यांना गंभीर दुखापत झाली.

त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथे प्राथमीक उपचार करुन पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले. अशा प्रकारे शासकीय रास्त भाव दुकानदारासोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी वाद होत आहेत. त्यामुळे शासकीय रास्त भाव दुकाने कशा प्रकारे चालावयाची हा प्रश्न उद्भवत आहे.
