नगरविकास विभागाच्या अवर सचिवाचे ;जिल्हाधिकार्यांना पत्र
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – कार्यालयाला पुरविण्यात आलेल्या चारचाकी वाहनांमध्ये १० लक्ष रुपयापेक्षा जास्त निधीचा अपहार केल्याप्रकरणी वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व वाहन पुरवठा कंत्राटदार (अग्नीशमन विभागाचे कंत्राटी चालक) यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिवसैनिक नितीन मडके यांनी माहिती अधिकारातुन सादर केलेली कागदपत्रे व दिलेली तक्रार तसेच खा. भावना गवळी यांनी कार्यवाहीबाबत दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने येत्या २८ फेब्रुवारीपर्यत स्पयंस्पष्ट अभिप्रायासह मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्राव्दारे दिले आहेत.
तसेच यापुर्वीच्या तक्रारीच्या अनुषंगाने मागीतलेला अहवाल देखील सादर करावा असे सुचित करण्यात आले आहे. या अपहार व भ्रष्टाचाराबाबत शिवसैनिक नितीन मडके यांनी माहिती अधिकारातुन मिळविलेल्या सर्व कागदपत्रांसह मुख्याधिकारी व वाहन पुरवठा कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नगर विकास विभागाला १ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती.
याबाबत नितीन मडके यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, न.प. मुख्याधिकारी व न.प. प्रशासन अधिकारी असा पदभार असलेले मुख्याधिकारी यांनी अनेक कामे चुकीच्या पध्दतीने केली आहेत. त्यांनी स्वत:साठी चारचाकी वाहन भाडेतत्वावर घेण्याचा ठरावही चुकीच्या पध्दतीने घेतला.
