२ लाख २१ हजाराच्या बक्षीसांची जंगी लुट
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – शिवजयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा व शहर शाखेचे आयोजन, शिवसैनिक नितीन मडके यांचा पुढाकार व दात्यांच्या सहकार्यातुन येत्या २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस स्थानिक देवाळा रस्त्यावरील खडकेश्वर येथे भव्य बैलगाडा शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त विजयी स्पर्धकांसाठी तब्बल २ लाख २१ हजार रुपयाच्या बक्षीसांची जंगी लुट करण्यात आली आहे. या बक्षीसांमध्ये दत्ताभाऊ लोणसुने, गणेश पवार, नामदेव गोरे, बबन देवकर, विजय वानखेडे, प्रकाश वानखेडे, अजयसिंग ठाकुर, स्व. भाऊराव खरबळकर, सागर गोरे, डॉ. निरगुडे, विठ्ठल इंगोले, संजय ढेगळे, मनिष चिपडे, देवानंद इंगळे, अरुण मडके, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, आशिष इंगोले, नितीन मडके, नगरसेवक अतुल वाटाणे, उमेश मोहळे, नबी सर, संजु वानखेडे, आनंद चरखा, तरण सेठी, राजु घोडीवाले, गोकुल वर्मा, वसंत धाडवे, प्रल्हाद सुर्वे, दत्ता इंगळे आदींनी आर्थिक सहकार्याचा भार उचलला आहे.
