अकोला | एका विवाहितेचे 17 वर्षीय मुलावर प्रेम ; मुलाला पळवल ; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली महिलेला अटक

अकोला वार्ता :- अकोलामध्ये एका महिलेला अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पोस्को अँक्ट अंतर्गत कारवाई केली आहे.

प्रेम हे नेहमी आंधळं असतं’, असं नेहमी म्हटलं जातं. यासोबतच ‘प्रेमात सारं क्षम्य असतं’, असंही म्हटलं जातं. मात्र, हेच प्रेम अकोल्यात एका महिलेसाठी अक्षम्य ठरलं आहे. अन् तिच्या याच अक्षम्य चुकीसाठी तिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला गजाआड व्हावं लागलं आहे.

पोलिसांनी सांगितलं की, 29 वर्षीय महिला आपल्या पतीपासून वेगळं राहत होती. पोलीस तरुणीची चौकशी करीत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी महिला एका डाळ मिलमध्ये काम करीत होती. येथेच तिची अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली.

यादरम्यान दोघे जवळ आले. अल्पवयीन मुलाचं व 17 वर्षांचं असल्याचं सांगितलं जात आहे.तो शहरातील खदान भागातील किर्तीनगर भागातील रहिवाशी होता यादरम्यान महिला आणि अल्पवयीन मुलामध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी महिला एका डाळ मिलमध्ये काम करीत होती.

येथे तिची एक अल्पवयीन मुलासोबत भेट झाली. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. यानंतर आरोपी महिला त्याला घेऊन शहराबाहेर निघून गेली. हे ही पत्नी, मेव्हणी अन् आणखी एक तरुणी; कलियुगातील या मेव्हण्याचं हैराण करणारं कृत्य!

महिलेची बहिणीची मुलगी देखील तिच्यासोबत राहत होती. मावशी घरात नसल्याचं पाहून ती रडत रडत शेजारच्यांकडे गेली. यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत गेला. मावशी घरात नव्हती तेव्हा गावातील अल्पवयीन मुलगाही आपल्या घरात नसल्याचं समोर आलं.या दोघांच्या प्रेमाची कुणकुण कुणालाच नव्हती. मुलगा बेपत्ता झाला म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. तर महिला बेपत्ता झाली म्हणून खदान पोलीस स्टोशनमध्ये तक्रार दाखल झाली.

यानुसार पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी तपास सुरू केला तर 9 फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगा घरी परतला आणि त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला प्रेमाच्या कैफात तो मुलगा अल्पवयीन असल्याचाही विसर पडला होता. आपल्यापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलावर प्रेम करणे या महिलेला चांगलंच महागात पडलं अहे. त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी खदान पोलिस तिच्याविरुद्ध बालसुरक्षा कायदा अर्थातच ‘पॉक्सो’नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिला आरोप महिलेला अटक करण्यात आली आहे.पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्रीरंगम यांनी सांगितले की, आरोपी महिलेचा जबाब नोंदवला जात असून, त्यानंतर तिला कोर्टात हजर केले जाईल.

मुलाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रेमासाठी आपल्या बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीला वाऱ्यावर सोडणाऱ्या या महिलेविषयी सर्वांच्याच मनात संतापाची भावना होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!