Post Views: 462
कंत्राटदार प्रमोद राजुरकर यांच्या कामावर प्रतिबंध
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत राज्य महामार्ग 161 लगत असलेल्या मथुरा हॉटेल ते झाकलवाडी रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी व संबंधीत ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी सामाजीक कार्यकर्ते जगदीश गोरे, अर्जुन काळबांडे यांच्यासह ग्रामस्थांनी मंगळवार, 15 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलेले उपोषण तिसर्या दिवशी 17 फेब्रुवारी रोजी लेखी आश्वासनाने मागे घेतले.
यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता खडसे, कनिष्ठ अभियंता मोकळे यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र सोपविले. त्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष राजु किडसे, शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष राजु वानखेडे, जि.प. सदस्य सुनिल चंदनशिव, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस गणेश उंडाळ, मनोज उंडाळ, अनिल काठोळे आदींच्या उपस्थितीत लिंबुशरबत घेवून आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान या उपोषणाला समाजसेवक मोहन चौधरी यांच्यासह सामाजीक संघटना व व्यक्तींनी भेट देवून आपला पाठींबा दिला आहे.
उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, झाकलवाडी रस्त्याचे काम येत्या 24 एप्रिल पर्यत पुर्ण झाल्यास चिद्दरवार कंस्टक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल. तसेच सदर काम करणारे ठेकेदार प्रमोद राजुरकर यांना या कामावर येण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे.
रा.मा.क्र. 161 लगत असलेल्या मथुरा हॉटेल ते बाकलीवाल कॉलनी पासून झाकलवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. याबाबत झाकलवाडी ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासकीय स्तरावर दिलेल्या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी 15 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यायासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. सदर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराविरुध्द कारवाई करण्यासह सदर रस्त्याचे काम नव्याने करण्याची मागणी उपोषणकर्ते गोरे व काळबांडे यांनी केली होती. उपोषणकर्त्यांच्या या मागण्या मान्य करण्यात आल्या असून येत्या 25 एप्रिलपर्यत नव्याने हा रस्ता तयार करण्याचे दिलेल्या लेखी पत्रात नमूद करण्यात आला आहे.
या उपोषणामध्ये मारोतराव काळबांडे, कोंडू काळबांडे, ज्ञानबा वाकुडकर, विशाल काळबांडे, सतिश चव्हाण, विठ्ठल काळबांडे, पांडूरंग भोपाळे, माधव काळबांडे, ज्ञानेश्वर काळबांडे, गोलु काळबांडे, कृष्णा काळबांडे, सय्यद जावेद सय्यद याकुब, रामेश्वर काळबांडे आदींनी सहभाग घेतला होता.