बलत्काराच्या आरोपीस न्यायालयाने सुनावली 10 वर्ष सश्रम कारावास व 6000/- दंडाची शिक्षा

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-पोलीस स्टेशन शिरपुर येथे सन 2017 मध्ये दि.06/05/2017 रोजी ने पो.स्टे.शिरपुर येथे
फिर्याद दिली होती.की त्या पांगरी नवघरे येथे लग्नाला गेल्या होत्या तेव्हा आरोपी नामे अश्विन यादव वानखेडे वय 19 वर्ष रा.पांगरी नवघरे यास त्यांची मुलगी पसंत पडली होती त्यामुळे त्याने पिडीतास लग्नाची मागणी घातली होती परंतु पिडीत मुलगी ही लहान असल्यामुळे फिर्यादीने मुलीच्या लग्नाला नकार दिला होता.

त्याचा मनात राग धरुन आरोपीने फिर्यादीच्या मुलीस जबरदस्ती गाडीवर बसुन घेवुन गेला होता. अशा रिपोर्ट वरुन आरोपी नामे अश्विन यादव वानखेडे वय 19 वर्ष रा.पांगरी नवघरे
विरुद्ध अपराध क्रंमाक 91/2017 कलम 363,366(अ) भा.द.वि. गुन्हा नोंद करण्यात आला
होता.

सदर गुन्ह्याच्या तपास पोउपनि.गणेश मुपडे पो.स्टे.शिरपुर यांचे कडे सोपविण्यात आला होता.
पोउपनि.मुपडे यांनी योग्य तपास करुन आरोपी व पिडीतेचा शोध घेतला होता. व आरोपीस अटक केली होती.तसेच पिडीतेच्या जबाबवरुन सदर गुन्ह्यात कलम 376 (2) (i) भां.द.वी सह कलम 4 बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम असे कलम वाढ करण्यात आली होती.

पो.उपनि.गणेश मुपडे यांनी योग्य रित्या तपास करुन आरोपी विरुद्ध मा.विषेश न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.मा.विषेश न्यायालयाच्या मा.न्यायाधिश डॉ.रचना आर.तेहरा यांच्या समक्ष सदर प्रकरण चालविले असुन दि.18/02/2022 रोजी मा.न्यायाधिश रचना आर.तेहरा यांनी दोन्ही पक्षाची बाजु ऐकुन घेवुन आरोपी हा सदर गुन्ह्यात दोषी आढळुन आल्याने आरोपी नामे नामे अश्विन यादव वानखेडे वय 19 वर्ष रा.पांगरी नवघरे ता.मालेगांव जि.वाशिम यास 10 वर्ष सश्रम कारावास व
6000/- दंडाची शिक्षा सुनावली आहे.आज आरोपीला शिक्षा झाल्याने पिडीतेस न्याय मिळाला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अँड.सुचिता कुलकर्णी यांनी कामकाज पाहीले तर मा.पोलीस अधिक्षक बच्चन सिंह ,अप्पर पोलीस अधिक्षक गोरखभामरे,उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी,पोलीस निरिक्षक सुनिल वानखडे यांच्या मार्गदर्शनात कार्ट पैरवी अधिकारी म्हणुन नापोका,भिमराव गवई ,मपोका ममता इंगोले यांनी कामकाज पाहीले.मागिल दोन महिण्यात 02 गंभिर गुन्हात आरोपीला शिक्षा झाल्या आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!