दर्यापूर – महेश बुंदे
नजीकच्या कोकर्डा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तरूणांनी शिवरायांचा जयजयकार केला. तसेच बस स्टॅन्ड चौक व ब्राह्मणवाडा सेवा सहकारी सोसायटी या दोन ठिकाणी शिवरांयाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हान, सरपंच सौ. पुष्पाताई ज्ञानेश्वर बारब्दे, उपसरपंच राजु सोळंके, माजी सरपंच लक्ष्मणराव कुले यांच्यासह तरूण मोठया संख्येने सहभागी झाले होते.
