प्रतिनिधी नीरज शेळके
ठाणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे येथील शिवराय प्रतिष्ठानने प्रतापगड ते ठाणे अशी शिवज्योत मोहीम आखली होती. या मोहिमेत अंतर्गत ठाणे येथील ज्ञानेश्वर शेळके या युवा मावळ्याने प्रतापगड ते पोलादपूर 30 किलोमीटरचे अंतर सलग कुठेही थांबा न घेता शिवज्योत हाती घेऊन धावण्याचा पराक्रम केला आहे. त्यानंतर पुन्हा 20 किलोमीटर धावून एकूण 50 किलोमीटरचे अंतर त्याने पार केले.
