दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाशरद पोर्टल सुरु ; नोंदणी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:- जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाने महाशरद पोर्टल सुरु केलेले आहे. दिव्यांग व्यक्ती या पोर्टलव्दारे शासनाच्या मंचावर सहाय्य उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करुन आवश्यक ती मदत सहकार्य मिळवु शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती,सामाजिक दानशुर व्यक्ती,सामाजिक संस्था,कंपन्या अशासकीय संघटना विनामुल्य जोडणारा दुवा आहे.

या पोर्टलव्दारे दिव्यांग व्यक्तींना व्यासपीठ मिळवुन दिले जात आहे.यामध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग व्यक्ती या पोर्टलवर आपले नाव नोंदवु शकतात दिव्यांग व्यक्ती आणि त्यांना देणगी देऊ ईच्छीणाऱ्या वर्गणीदाराला एकत्र आणून वर्गणीदाराचे सहकार्य या पोर्टलव्दारे मिळविण्यात येत आहे.पोर्टलच्या माध्यमातुन दिव्यांगाना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळची माहिती तसेच विविधप्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परिस्थिती आणि गरजा समजुन घेऊन दिव्यांग व्यक्ती अशासकीय संघटना समाज सेवक आणि वर्गणीदार यांना एकाच छताखाली आणण्यात येत आहे.त्याकरीता www.mahasharad.in या संकेत स्थळावर दिव्यांग व्यक्ती,विद्यार्थी सामाजिक संस्था देणगीदार कंपन्या यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी एम.जी.वाठ यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!