शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थित
दर्यापूर – महेश बुंदे
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न असणाऱ्या दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. दीपाली गोपालराव देशमुख ही वाणिज्य व व्यवस्थापन(बीकॉम)शाखेच्या उन्हाळी परीक्षा-२०२१ मध्ये विघापीठातून पाचवी मेरीट व श्री शिवाजी शिक्षण संस्थेतुन प्रथम आली याबद्दल व माजी विद्यार्थिनी श्रीमती भावना संकेत भुतडा (गावंडे) यांना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछत्रवृत्ती अंतर्गत स्पायडर पीएचडी करिता निवड झाल्याबद्दल त्याचा दि. १५ फेब्रुवारी रोजी जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
