अपहरण करून तरुणाचा खून ; मृतदेह मिळाला भीमा नदी पात्रात ; कोयाळी मधील घटना

 आळंदी वार्ता :- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीचे खून करण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून अपहरण केले. हा प्रकार रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील कोयाळी भानोबाची मधील काळे वस्ती येथे घडला. अपहरण झालेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह निकम वस्ती, कोयाळी येथील भीमा नदी पात्रात दि.१६ रोजी सापडला आहे.

लक्ष्मण यशवंत शिंदे (वय 31) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी सुनीता लक्ष्मण शिंदे (वय 27, रा. काळे वस्ती, कोयाळी, ता. खेड, पुणे. मूळ रा. देवणी, ता. उदगीर, लातूर) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुनील जयवंत पांढरे, कोंडीबा लहू काळे, संतोष उर्फ पिंटू लहू काळे, शिवाजी पांडुरंग कोळेकर (सर्व रा. काळे वस्ती, कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती लक्ष्मण शिंदे आणि आरोपी यांचे 6 एप्रिल 2021 रोजी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मण शिंदे यांना त्यांच्या घरासमोरून दुचाकीवर बसवून कोंडीबा काळे याच्या घरी नेले. तिथे आरोपींनी लक्ष्मण काळे यांचा खून करण्यासाठी अपहरण करून त्यांचा खून केला असल्याची फिर्यादी यांना खात्री असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सुनील पांढरे, कोंडीबा काळे यांना अटक केली. कोंडीबा काळे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून लक्ष्मण शिंदे यांचा खून केला असून मृतदेह निकम वस्ती येथे भीमा नदीच्या पात्रात पुरला असल्याचे सांगितले.पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे दिसून येत असल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी शोध घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. या गुन्ह्यात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत कलमवाढ करण्यात आली आहे. आळंदी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!