प्रतिनिधी फुलचंद भघत
वाशिम:-राज्यातील वन्यजिवन सवर्धनासाठी वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीस व त्यांच्या अवयवांच्या चोरटया व्यापारास आळा घालण्यासाठी राज्यात राज्यस्तरीय व महसुल विभागस्तरीय / व्याघ्र कक्ष समिती स्थापन करण्यात येतात.
वाशिम जिल्हयात दिनांक ११/०२/२०२२ रोजी मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री.बच्चन सिंह यांचे
अध्यक्षतेखाली पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे जिल्हास्तरीय व्याघ्र कक्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
सभेमध्ये श्री. उत्तम फड सह-अध्यक्ष तसेच विभागीय वन अधिकारी दक्षता यवतमाळ, श्री. विपुल राठोड उप वन संरक्षक (प्रादेशिक) वाशिम, गौरव इंगळे सदस्य मानद वन्यजिवन रक्षक यांचे उपस्थिीत पार पडली. राज्यातील वन्यजीव संवर्धनासाटी, वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या शिकारी/तस्करी व अवैध अवयवांच्या चोरटया व्यापारास आळा घालणे बाबत सर्व उपस्थित अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या तसेच बैठकीत खालील मुदयावर चर्चा करण्यात आली.सन २०२१ मध्ये वाघ/बिबटया शिकारीच्या प्रकरणाचा बाबत सविस्तर आढावा,वन्यप्राणी शिकार प्रकरण दाखल करुन किती प्रकरणात आरोपीना अटक केली,वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी नोंद वन गुन्हे प्रकरणाची सदयस्थिती,वन अधिकारी/कर्मचारी यांना शस्त्र संबंधीत प्रशिक्षणा बाबत आढावा,वनसंरक्षण करताना वन अधिकारी/कर्मचारी यांचेवर झालेल्या हल्लया बाबत माहिती,पिकांचे संरक्षणार्थ तारेचे कुंपणातुन विदयुत प्रवाह सोडण व अशा विदयुत प्रवाहामुळे झालेल्या, वन्यप्राण्यांचे मृत्युंची सन २०२० व २०२१ या वर्षातील प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली,वन जमिनिवरील अतिक्रमणे हटविताना पोलीस विभागाकडुन अपेक्षित सहकार्यविषयी चर्चा,वनसंरक्षणाच्या कार्यवाही संबंधी वन कर्मचाऱ्याविरुध्द पोलीस विभागाकडुन दाखल प्रकरणांचा आढावा उपवनसंरक्षक यांचे कार्यक्षेत्रातील संघटीत वन गुन्हेगारी विषयी आढावा,आंतरराज्य सिमेवरील वनसंरक्षणा विषयी समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच पोलीस विभागामार्फत दिनांक ०९/०२/२०२२ अनसिंग ते पिंपळगाव रोडवरील खडसिंग गावाजवळील शेत शिवारातुन बेहडा याआडजातीच्या झाडाचे खोड विनापरवाना बेकायदेशीररित्या कटाई करत असताना पोलीसांना मिळुन आले आडजातीच्या झाडाचे खोड वाहुन नेण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन वनविभागस पत्रव्यवहार करुन कायदेशीर करण्याबाबत कळविले.
