प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा. पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करून
कायदेशीर कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोस्टेला सक्त आदेश देण्यात आलेले आहेत.त्यानुसार सर्व पोस्टे हददीत अवैध धंदयांवर कडक कार्यवाहया सुरू आहेत.
वरीष्टांच्या निर्देशानुसार पोस्टे आसेगाव हददीत दिनांक १३/०२/२०२२ रोजी ठाणेदार सपोनि
नरसाळे, पोउपनि खंदारे व त्यांचे पथक गस्तीवर असतांना त्याना मिळालेल्या माहीतीच्या आधारे ग्रामधानोरा येथील धानोरकर विदयालयासमोर. धानोरा ते आसेगाव रोडवर एका आयशर गाडी क एम एच१५ जि व्ही ००९० या मध्ये अवैध रित्या जनावरांना निर्दयतेने वागनुक देवुन वाहनामध्ये कोंबुन. म्हैस जातीचे एकुन ४० जनावरे त्यापैकी ३५ हाले व ०५ वगारी अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आला. सदरचे एकुन ४० जनावरे किंमत २४००००/रू व वाहतुक करनारा आयशर ट्रक क एम एच १५ जि. व्ही ००९० किंमत ५०००००/रू असा एकुन ७४००००/रू चा माल आरोपी १) चालक शेख अल्ताब शेख मुस्ताक वय २९ वर्ष २) मालक शेख सलमान शेख उस्मान वय ३५ वर्ष दोन्ही रा. आसेगाव यांचे कडुन जप्त करून त्यांचे विध्द पोस्टे आसेगाव येथे फिर्यादी पोकॉ गणेश बर्गे ब. नं
१४६७ यांचे लेखी रिपोर्ट वरून अप. नं. ३५/२०२२ प्राण्यांना कूरतेने वागविण्यास प्रतीबंध करण्याबाबत अधीनियम १९६० (सुधारीत) कलम ११(१)(घ)(ड) सह कलम महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधीनियम (सुधारीत) कलम ५(अ) (१), ९ प्रमाने गुन्हा दाखल करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
