दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गरीब, आदिवासी व अन्य समाजाच्या रुग्णांना आरोग्यसुविधा मिळावी, यासाठी सोनोग्राफी कक्षाचे उद्घाटन आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, वैद्यकीय शिक्षण व रेडिओ लॉजिस्ट डॉ. तायडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. घोडस्कर, ढोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष डाबेराव उपस्थित होते.
