रुग्णसेवा ग्रुपचा आरोग्यरथ ठरतोय शेलूबाजार परिसरातील अपघातग्रस्तासाठी वरदान

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-गेल्या अनेक वर्षापासून रुग्नसेवा मध्ये सक्रिय असणाऱ्या रुग्णसेवा युवा ग्रुपचा आरोग्यरथ शेलुबाजार परिसरातील अपघात ग्रस्त नागरिकांसाठी वरदान ठरतोय.

गेल्या काही महिन्यांपासून शेलुबाजार परिसरातील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढतच आहे, अशातच शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच शासकीय रुग्णवाहिका असल्याने त्या एकाच रुग्णवाहिकेवर भरपूर मोठा असा भार आहे, त्यामुळे परिसरात जेव्हा कोणताही अपघात घडतो त्यावेळी रुग्णसेवा युवा ग्रुपचा आरोग्य तेथे घटनास्थळी तात्काळ दाखल असतो, साळुंकाबाई राऊत महाविद्यालय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य सदर आरोग्यरथ घेऊन तात्काळ घटनास्थळी रवाना होत असतात.

जेव्हा कोणत्याही व्यक्तीचा अपघात होतो तेव्हा त्याला पहिली गरज असते ती तात्काळ उपचाराची त्यामुळे जेव्हा अपघात घडतो तेव्हा तात्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णसेवा युवा ग्रुपचा आरोग्य सदर व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्र व गरजेच्या वेळी अकोला येथे मोफत पोहचून देऊन आपली रुग्णसेवा करत असतो.लोकवर्गणी मधून उभा केलेला हा आरोग्य रथ खरोखरच आज संपूर्ण शेलुबाजार परिसरासाठी एक प्रकारे वरदान ठरतोय.
आतापर्यंत अनेक अपघातग्रस्तांना या आरोग्यरथाने रुग्णालयापर्यंत पोचून त्यांना प्राथमिक उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे.
आरोग्यरथ उभा करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळीचे रुग्णसेवा युवा ग्रुप च्या वतीने आभार मानले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!