प्रतिनिधी सुनील बटवाल
आळंदी : येथील तीर्थक्षेत्र आळंदीचा विकास करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष देण्याचे आवाहन बांधकाम राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी केले. विविध रस्ते विकास कामांचे भूमिपुजन, भामा आसखेड येथून बंधिस्त पाईप लाईन मधून कुरुळी जलशुद्धीकरण केंद्र ते आळंदी पाणी पुरवठा केंद्र बंधिस्त पाईप लाईन विकास योजनेचे लोकार्पण, रस्त्याचे उदघाटन राज्यमंत्री दत्ता मामा भरणे आणि खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे हस्ते झाले.

या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. नारायण जाधवमहाराज होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समिती सभापती अरुण चौधरी,माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे पाटील ,बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी विरोधी पक्ष गटनेते नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सागर भोसले, तुषार घुंडरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कैलास सांडभोर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, महिला शहराध्यक्षा रुपाली पानसरे, संदेश तापकीर, शशिकांत घुंडरे, धंनजय घुंडरे, निसार सय्यद,विलास कातोरे, अक्षय रंधवे, उत्तम गोगावले,सुनील रानवडे, बाळशेठ ठाकूर,माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे, अशोक आबा कुऱ्हाडे, भाऊसाहेब कोळेकर,माऊली गुळुंजकर, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सागर रानवडे, संतोष भोसले, अनिकेत कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे, गौरी तापकीर आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी आमदार दिलीप मोहिते यांचे विकास कामाचा आढावा घेत कौतुक केले. आमदार मोहिते यांची कामे करून घेण्याचे पद्धतीत आदर पूर्वक दहशत आहे. यामुळे खेड मधील विकास कामे मार्गी लावण्यास गती मिळते. सहकार्य होते. मात्र यातून कोणाचे नुकसान व्हावे, कोणाला कमी पणा येईल, अशी त्यांची कधीच भूमिका नसते. आमदार मोहिते यांना पूर्ण समजून घेतले तर त्यांचा सारखा आमदार दुसरा कोणीही नाही. पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातून विकास कामे करताना विधायक कामांना प्राधान्य दिले जात असून अण्णामुळे खेड तालुक्यातील विकास कामे गतीने होत आहेत.

राजकारणात निष्ठा,प्रेम यामुळे कामे करताना फायदा होतो. मला देखील राजकीय वारसा नसताना मी ही या पदापर्यंत पोहोचलो. निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे समोर स्वताचे उदाहरण देत विविध पदावर काम करण्याची संधी पवार कुटुंबियांमुळे मिळाल्याचे सांगितले. यामुळे विविध पदावर काम करण्याची संधी लाभली. आता राज्यमंत्री म्हणून काम करीत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे पवार कुटुंबियांवर असलेले प्रेम, निष्ठा आहे. ते म्हणाले, राजकारणात यशस्वी होण्यास कधी कधी दोन पाऊले मागे घेऊन दोन पाऊले पुढे टाका. राजकारण करताना माफ करण्यास शिका, यापुढील काळात विकास कामात आळंदी ही मागे रहाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आळंदीतील राजकीय परिस्थितीवर सभेत भाष्य करीत नेते कार्यकर्ते यांनी निष्ठा जपली पाहिजे असे सांगितले. राज्यात तीर्थक्षेत्र विकासाची कामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचे कार्यकाळात मंजूर केलेलीच कामे आळंदीत झाली आहेत. कोणतीही नवी लक्षवेधी कामे झाली नाहीत. आळंदीच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. येथील अधिकच्या विकास कामांसाठी आता येथील नेते , कार्यकर्ते आणि नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती येथील सत्ता सोपवा, यातून तीर्थक्षेत्र आळंदीचा चेहरा मोहरा बदलवू अशी ग्वाही आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.

येत्या निवडणुकीत स्थानिक कारभारी मंडळी यांनी सर्वाना बरोबर घेऊन एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची गरज आहे.अन्यथा येथील परिस्थिती महापालिकेच्या सारखी होईल. एकाच ठिकाणी मतदान होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील,उत्तम गोगावले यांनी भाषणे केली. अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक व आभार माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांनी मानले.

