अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या अध्यक्षपदी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या अध्यक्षपदी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद
अमरावती वार्ता – : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाराव्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदा करीता आज (बुधवार) बँकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सुधाकर नारायणराव भारसाकळे आणि सुरेश बापूरावजी साबळे हे विजयी झाले.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे EXCLUSIVE – महेश बुंदे
सुधाकर भारसाकळे हे बॅंकेचे अध्यक्षपद भुषविणार आहेत तर सुरेश साबळे हे उपाध्यक्षपदाचा कारभार पाहणार आहेत.चार ऑक्टोबरला बॅंकेच्या १७,संचालकपदाच्या जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सहकार पॅनलने तब्बल १२ ,जागा जिंकल्या.
एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर उर्वरित चार जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या. बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये दोन्ही पॅनलचा प्रत्येकी एक संचालक असून उर्वरित दोन संचालक तटस्थ होते.
या निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारास १५ तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारास सहा मते मिळाली. यानंतर पिठासीन अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सुधाकर भारसाकळे यांची अध्यक्ष तसेच सुरेश साबळे यांची उपाध्यक्ष पदासाठी विजयी झाल्याची घोषणा केली.
बॅंकेच्या निवडणुकी दरम्यान अनेक आक्षेप सहकार पॅनलवर लावण्यात आले होते मात्र विरोधकांच्या हाती काही लागले नाही. बँकेचे सभासद, शेतकरी हे सहकार पॅनलच्या पाठीशी खंबरीपणे उभे राहिले व विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची प्रतिक्रिया बबलू देशमुख यांनी यावेळी दिली.
बँकेवर जे आरोप विरोधकांनी केले ते सर्व बिनबुडाचे आहेत. येत्या काही दिवसांतच तुम्हांला दूध का दूध आणि पानी का पानी पाहायला मिळणार आहे. त्या आरोपमध्ये काही तथ्य नाही. सहकार पॅनल नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे पॅनल आहे, यापुढे ही आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत राहू व बँकेला अजून उंच शिखरावर नेऊ अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी व्यक्त केली.