सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर मावळ व आंबेगाव तालुक्यात आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बैलगाडा धावले.
पुणे जिल्ह्यातील मावळ मध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली आहे तर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून आंबेगाव घाटात बैलगाडा शर्यत आयोजित.
बैलगाडा शर्यतीची पहिली बारी आज मावळात व आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे सकाळ पासूनच बैलगाडा प्रेमी आणि मालक मोठ्या संख्येने मावळ मधील नानोली येथे व आंबेगाव मधील लांडेवाडी येथे दाखल झाले आणि नऊच्या सुमारास घाटावरून शर्यतींना सुरुवात झाली. आणि मावळमध्ये व आंबेगावमध्ये अखेर भिर्रर्रर्रर्र झालं.
तब्बल आठ वर्षांनंतर शर्यत पहिल्या मिळाल्याने बैलगाडा मालक शेतकरी तसेच बैलगाडा शौकीनांमध्ये उत्साह दिसून आला. मावळ तालुक्यातील नानोली बैलगाडा घाटावर हजारो बैलगाडा शौकीनची गर्दी पाहायला मिळाली.

आम्ही बैलांना मुलाप्रमाणे जपतो त्यामुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणू नये अशी कळकळीची मागणी देखील बैलगाडा प्रेमींनी केली आहे. आंबेगाव येथे लांडेवाडी घाटात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहिला मिळाला आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शर्यतीच आयोजन केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्थींसह बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर पुण्यात आज पहिल्यांदाच घाटात धुरळा उडाला. आंबेगाव आणि मावळ तालुक्यात दोन दिवस शर्यत पार पडणार आहे. लांडेवाडीच्या घाटात आठशे तर नाणोलीच्या घाटात साडे तीनशे बैलजोड्या धावणार आहेत.

शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते शर्यतींना प्रारंभ करण्यात आला. माझ्या राजकीय जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. भिर्र् झाली…उचल की टाक…या पहाडी आवाजात परिसर दुमदुमून गेला होता. तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहताना बैलगाडा शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने जमले हेाते.

तब्बल सात वर्षांनंतर बैलगाडा शर्यती सुरु झाल्यामुळे बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. माझ्या राजकीय जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले नियम व अटींचे पालन करूनच बैलगाडे सुरु आहेत. गावकऱ्यांचेनियोजन उत्कृष्ठ आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यत होत असल्याने बैलगाडा शौकीन, शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आमदार शेळके यांच्या पुढाकाराने होणार्या या शर्यतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शर्यतीचे नियोजन अखिल भारतीय बैलगाडा संघटना व मावळ तालुका शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.
दरम्यान या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकात येणार्या प्रत्येक बारीस एक दुचाकी देण्यात येणार आहे, द्वितीय क्रमांकास 1 लाख 51 हजार, तृतीय क्रमांकास 1 लाख व चतुर्थ क्रमांकास 75 हजार रुपयांची रोख बक्षिसे व प्रत्येक क्रमांकास अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
फायनलमध्ये येणार्या बैलगाड्यांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार व 21 हजार रुपयांची रोख बक्षिसे व घाटाचा राजा किताब पटकवणार्या गाड्यास एक तोळ्याची सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
मावाळ तालुक्यातील बैलगाडा शर्यत काही छायाचित्रे व व्हिडिओ








आंबेगाव तालुका लांडेवाडी बैलगाडा शर्यत छायाचित्रे व व्हिडिओ



