प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-खाकी वर्दी दिसली की दहशत , भीती व दंडुका डोळ्यासमोर येते पण पोलिसांची दुसरी बाजू मात्र समोर येत नाही .शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून लक्ष केंद्रित करतात अश्या त्यांच्या धकाधकीच्या जीवनातही अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी आपलं माणुसकीचं नातं विसरत नाही.

कारंजा लाड तालुक्यातील धनज येथील ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या बाबतीत असाच एक सुखद अनुभव तेथील जनतेला आला. एक वृद्ध महिला जी ला रस्ता पलीकडे पार करावयाचा होता पण रस्त्यावर रहदारी भरपूर असल्याने ती पलीकडे जाऊन शकत नव्हती तेवढ्यात धनज चे ठाणेदार अनिल ठाकरे तेथुन जात असताना त्यांच्या नजरेत ती म्हातारी महिला रस्ता पार करण्यासाठी प्रयत्न करीत असलेली दिसली पण रस्त्यावरील रहदारीच्या भीती मुळे ती करु शकत नव्हती तेवढ्यात ठाणेदार अनिल ठाकरेनी आपली गाडी थांबवली व प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या वृद्ध म्हातारीची विचारपूस करून तिला रस्ता पार करण्यासाठी मदत केली.
