सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची साठवणुक करुन विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत “
पुणे वार्ता :- मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक १०/०२/२०२२ रोजी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची साठवणुक करुन विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
पहा कारवाई व्हिडिओ
दिनांक १०/०२/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत बिरदवडी, चाकण ता. खेड जि. पुणे येथील राजेश राक्षे यांच्या रुममध्ये इसम नामे राघवेंद्र उर्फे संतोष शर्मा हा शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखूजन्य गुटख्याची साठवणुक करुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत आहे.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत रात्रभर सापळा रचुन सकाळी ०७:२० वाजता छापा टाकुन खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
१) २२,३४०/- रु रोख रक्कम. , २) ४,५५,४४०/-रुकिंचा तंबाखूजन्य गुटखा, ३) १,००,०००/- रु कि ची एक हुंडाई कंपनीची एमएच १० ई १३८६ क्रमांकाची चारचाकी कार, असा एकुण ५७७,७८०/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे १) राघवेंद्र उर्फे संतोष विजयशंकरशर्मा वय ३८ वर्षे रा. सध्या बिरदवडी, चाकण ता. खेड जि. पुणे मुळगांव ग्राम महापोली पो. ईटो ता. मांडवगड जि. जालवन राज्य उत्तरप्रदेश (गुटखा मालक) २) संदिप ग्यानदास चौधरी वय २६ वर्षे रा. सध्या बिरदवडी चाकण ता. खेड जि. पुणे मुळगांव मु. ग्राममजीद ता. मांडवगड जि. जालम राज्य उत्तरप्रदेश (कामगार ) तसेच पाहिजे आरोपी नामे ३) कृष्ण मुरारी उर्फे कल्लु गुप्ता मौनं ९७६४८४८४८५ (पुर्ण नांव पत्ता माहित नाही) ४) राजेश राक्षे वय अंदाजे ४० वर्षे रा. भोसरी, पुणे (पुणे नांव पत्ता माहित नाही) (रुम मालक) यांचेविरुध्द चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं २१३/२०२२ भादंवि कलम ३२८ २७२, २७३ १८८ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अपर पोलीस आयुक्त श्री. डॉ.संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. काकासाहेब डोळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. श्री. प्रशांत अमृतकर, व.पोनि श्री देवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील स.पोनि श्री. डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि श्री. प्रदिपसिंग सिसोदे पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे यांनी केली आहे.