प्रतिनिधी- महेश बुंदे
दर्यापूर -: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख व प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत दादा वरपे यांच्या सुचनेने अबकी बार महेंगाई पे वार या टॅग लाईन खाली संपूर्ण जिल्हाभरात प्रा. डॉ. सुशील गावंडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात येत आहेत. देशातील पेट्रोल, डिझेल, गॅसची होणारी दरवाढी सर्व सामान्यांचे कंबरर्ड मोडणारी आहे. करोना महामारीच्या काळात असंख्य लोकांचे रोजगार गेले असतांना बऱ्याच लोकांची एक-वेळच्या जेवणाची सोय नसताना ही होणारी दरवाढ सर्वसामान्य जनतेला न झेपावणारी आहे.

म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस दर्यापूर शहर व ग्रामीणच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांच्या उपस्थितीत गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत बैलगाडी मोर्चा काढत या निष्ठुर पणाने दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.
