Post Views: 635
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम ,एनसीसी अधिकारी अमोल काळे यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात ९ फेब्रुवारी रोजी आयोजीत क्राफ्ट वर्क स्पर्धेत विद्याथ्यार्र्ंनी आपल्या अतुल्य बुध्दीमत्तेचे व कल्पकतेचे प्रदर्शन घडवित हुबेहुब रायफल व मशीनगन बनविल्या.
कोविड महामारीमुळे सर्व जग थांबले परंतु काहीतरी नवनविन करू पाहणार्या विद्यार्थ्यांच्या बुध्दीला चालना देण्यासाठी या क्राफ्ट वर्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अगदी हुबेहुब अशी एलएमजी रायफल, २२ स्पॉटिंग रायफल, मशीनगन आदी साकारल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रोशन संजय बाजड, द्वितीय क्रमांक साक्षी बजरंगी सहानी, तृतीय क्रमांक शशांक शिवाजी बल्लाळ या विद्यार्थ्यांनी पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.