वाशिम जिल्ह्यातील अनेक कुटुंबे सावरली;सन २०२१ या वर्षी हरविलेल्या १५२ पुरूष व २३८ महिलांचा लावला शोध

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक याची स्थापना करून गरजुना विहित वेळेत मदत उपलब्ध करुन दिली, पिडीत, गरजु संकटात सापडलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी याकरीता डायल ११२ ची स्थापना करण्यात आली.

त्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत
आहे.व तसेच महीला ,मुली यांचे करीता विविध उपकम हाती घेतले असुन, वाशिम जिल्हयात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच नियंत्रण कक्ष वाशिम येथे मिसींग डेस्क कार्यान्वित असुन त्या व्दारे हरविले महीला व पुरूष यांचे शोध घेण्याकरीता सतत प्रयत्न करण्यात येतात.


सन २०२१ मध्ये जिल्हयात १८ वर्षा वरील एकुण १८७ पुरुष हरविले असुन त्यापैकी १५२ पुरूषांचा शोध लावण्यात आला तसेच २९० हरविलेल्या स्त्रिया पैकी २३८ महीलांचा शोध लावण्यात आला आहे.

तसेच मिसींग डेस्कद्वारे सन-२०२१ या कालावधीत ५१ महीला, ०७ मुली, ०२ मुले व १४ पुरूषांचा शोध घेण्यात आला आहे. मिसिंग डेस्कचे कार्यवाही दरम्यान नियंत्रण कक्ष वाशिम येथुन हरविलेल्या महिला पुरूष यांचे तक्रारदारास प्रत्यक्ष संपर्क करून महिला व पुरूष मिळाले अगर कसे याना तक्रारदार यांने मोबाईल क्रमांकावर संपर्क करून दरमहा पाठपुरावा करून शोध घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

मिसिंग डेस्क कार्यवाही दरम्यान हरविलेल्या महिलांचे नातेवाईकास संपर्क करून महिला घरी परत आली किंवा कसे याबाबत फोनद्वारे विचारणा केली असता पो.स्टे. मंगरुळपीर हद्दीतील मिसींग महिला बाबत दि.२२/०९/२०२१ रोजी मिसींगची पो.स्टे.ला तकार प्राप्त होती. तरी संबधित मिसिंग महिला ही दिनांक १६/१०/२०२१ रोजी पोलीसांनी अतोनात परिश्रम करुन सदर महिलेचा शोध घेतला असता मिळुन आली.

तसेच पो.स्टे.अनसिंग हद्दीतील एक महिला ही तिचे लहान मुलांसह दि.०५/०४/२०२१ रोजी हरविली
असता त्याबाबत पो.स्टे.अनसिंगला मिसिंग दाखल करण्यात आली होती. सदर हरविलेली महिला व तिचे लहान मुलांचा पोलीसांनी अथक परिश्रम करून शोध घेतला आणि त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिल्याने संबंधीत तक्रारदार यांनी भावनिक होवुन पोलीसांचे सहकार्यामुळे महिला घरी परत आल्यानंतर त्यांचे पोलीस विभागाचे कार्यवाहीमुळे समाधान झाल्याचे कळविले आहे.

तसेच जिल्हयात दिनांक १५/०१/२०२२ ते दिनांक १५/०२/२०२२ या कालावधी दरम्यान
जिल्हयातील हरविले / पळविले मुले /मुली व महीला /पुरूष यांचे शोध कामी पोस्टे (तरावर अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच महीला पोलीस कर्मचारी यांचे विशेष शोध पथक तयार करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!