गजानन महाराज मंदिर वरुड, साई मंदिर जरुड व बेनोडा हद्दीत दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार गजाआड

रवी मारोटकर ब्युरो चीफ

अमरावती वार्ता :- पोलीस स्टेशन वरुड येथे दिनांक १५/०१/२०२२ रोजी फिर्यादी सुरेश पुंडलीकराव गुर्जर रा.जरुड यांनी पोलिस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला की, कोणीतरी अज्ञात चोराने साई मंदिर जरुड येथे मंदिराची खिडकी तोडुन दानपेटीतून नगदी मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्याद वरून पोलिस स्टेशनला कलम ४५७,३८० भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या घरफोडींच्या व मंदिर चोरीच्या घटना पाहता मा. पोलिस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणनेबाबत निर्देशित केले होते.

त्या अनुषंगानेदिनांक ०८/०२/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस स्टेशन मोर्शी, वरुड हद्दीत पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, साई मंदिर जरुड व गजानन महाराज मंदिर वरुड येथील मंदिरातील चोरी ही महेश गजानन लोणारे रा. जामगाव बु याने केली आहे.आणि तो सातनूर येथे येवून आहे.

अशा मिळालेल्या माहीतीवरुन सातनुर येथे सापळा रचुन आरोपी महेश गजानन लोणारे, वय २६ वर्ष, रा जामगाव बु ता. नरखेड, जि नागपुर यास ताब्यात घेतले. त्यास साई मंदिर जरुड व गजानन महाराज मंदिर वरुड येथील मंदिरातील चोरी सबंधाने अधीक विश्वासात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने साई मंदिर जरुड व गजानन महाराज मंदिर वरुड येथील मंदिरातील चोरी तसेच पोलीस स्टेशन बेनोडा हददीतील ग्राम करजगाव बेनोडा येथे दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली .

पहा व्हिडिओ

सदर आरोपी महेश गजानन लोणारे, वय २६ वर्ष, रा जामगाव बु. ता. नरखेड, जि नागपुर ह्याला अटक करून त्याकडून मंदिर चोरी, घरफोडी च्या गुन्हयातील नगदी ऐवज, मोबाईल व वर्धा जिल्यातील गुन्हा करतेवेळी वापरलेल्या चोरीच्या २ मोटर सायकल असा एकुण ८७७३०/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमुद आरोपी कडुन पोलीस स्टेशन वरुड अभिलेखावरील गुन्हे १) अप.क्रं. ३९ / २२ कलम ४५७,३८० भादवि२) अप. क्रं. ६७ / २०२२ कलम ४५७,३८० भादवि पोलीस स्टेशन बेनोडा ३) अप.क्रं. ३३६/२०२२ कलम ४५४,३८० भादवि ४) अप. क्रं. ३४० / २०२२ कलम ४५४,३८० भादवि असे ०४ गुन्हे उघडकीस आले. तसेच नमुद सराईत आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. शशीकांत सातव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात पो.उप.नि. आशिष चौधरी, स.पो.उप.नि. संतोष मंदाने, नापोकों रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, पोकों दिनेश कनोजीया, पोकों पंकन फाटे, पोहेको नितीन कळमकर, नापोका. नितेश तेलगोटे व सायबर सेल नापोका सागर धापड, पो. कॉ. रितेश वानखडे, शिवा सिरसाट, सरीता चौधरी यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!