प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम: वाशिम जिल्ह्यात मोबाईल नेटवर्कसाठी पालकाने देशी जुगाड करुन अडचनच दुर केली असुन याची सर्वञ चर्चा होत आहे.गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात ते उगीच नाही. असंख्य मानवी गरजांतूनच आजतागायत विविध शोध जगासमोर आले आहेत.
ग्रामीण भागातही टॅलेंटची काही कमी नाही, हे पिंप्री अवगण येथील पालकाच्या देशी जुगाडाने दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गासाठी माेबाइलला नेट कनेक्टिव्हिटीचा खाेडा येत असल्याने अफलातून शाेध लावला. प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर आता गावातील प्रत्येक घरावर तबकड्या पाहायला मिळत आहेत.वाशिम जिल्ह्यात असलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण या गावातील नागरिकांनी घरात मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही म्हणून घराच्या छतावर स्वनिर्मित मोबाइलचे टॉवरच उभारले आहे.

स्टील प्लेट्स आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाइल नेटवर्कचे हे मिनी टॉवर आपल्याला पिंप्री अवगण या गावात घरोघरी पाहायला मिळतात. दरम्यान, कोरोना काळात ऑनलाईन वर्गासाठी घरात मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही म्हणून मोबाइल नेटवर्कची रेंज वाढविण्यासाठी पिंप्री येथील संदीप अवगण यांनी या युक्तीचा शोध लावून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गाच्या प्रश्नांसोबतच गावकऱ्यांचा घराच्या छतावर, पत्र्यावर जाऊन फोनवर बोलण्याचा त्रास मिटविला आहे.

अशी मिळविली फ्रिक्वेन्सी
वायफाय तंत्रज्ञानाच्या कनेक्शनला काही प्लेट्स असतात, तसेच रेडिओ फ्रिक्वेन्सी व्यवस्थित करण्यासाठी पूर्वी त्याचा अँटिना थोडा उंच धरल्यास हवे ते स्टेशन सुरळीतपणे चालते, या पूर्वज्ञानातून संदीप अवगण या पालकाने दोन स्टीलच्या प्लेट्स विरुद्ध दिशेला लाकडी बांबूवर जोडल्या. त्याला टीव्ही डिशची तार जोडून तारेचे एक टोक घरात सेट केले. आसपासच्या मोबाइल टॉवरवरून सिग्नलशी जोडणाऱ्या वायू लहरींमधून पूर्वी मोबाइल सिग्नल नसणाऱ्या ठिकाणीही आता हायस्पीड नेटवर्क आल्याने पिंप्री अवगणवाशीयांच्या या देशी संशोधनाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

नामी युक्तीमुळे विद्यार्थ्यांना फायदा