Post Views: 407
अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
तालुक्यातील संकल्प व्यसनमुक्ती केंद्र कारला द्वारा त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रामुख्याने अध्यक्ष स्थानी उमाताई गजानन दाळू तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये विकास गजानन वानखडे, भारत विजय तेलगोटे, अरुणा दोड, संस्थासचिव एम. एम. भांबेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम रमाईच्या प्रतिमेचे पूजन आणि हार अर्पण करण्यात आले, त्यानंतर उपस्थितानी रमाईचे कर्तुत्व, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील त्यांचे योगदान, त्यांची संघर्षगाथा याविषयी आपले विचार मांडले. यावेळी केंद्रातर्फे विनोद धुमाळे, प्रतीक वानखडे, वंदनाताई घुले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्राचे प्रकल्प संचालक जी.के. पाटील यांनी केले.