समाजसेवक रामुशेठ मालपाणी यांच्या कौसल्याबाई मालपाणी निवारा ट्रस्टच्या वतीने कामाला सुरुवात
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील मातंग पुरा रमाबाई आंबेडकर नगर बनोसा येथील सामान्य कुटुंबातील गजानन वाघमारे यांच्या हलाकीच्या परिस्थीतीमुळे त्यांचं घर ते पूर्ण करू शकत नव्हते व शासनाच्या नियमात बसत नसल्यामुळे त्यांच्या या परिस्थितीबद्दल दर्यापूर येथील कौसल्याबाई मालपाणी निवारा ट्रस्टचे अध्यक्ष तथा समाजसेवक रामुशेठ मालपाणी यांनी जेव्हा त्या परिसराची पाहणी केली तेव्हा त्या व्यक्तीला हक्काचे घर बांधून देण्याचा संकल्प त्यांनी अंगिकारला.
अखेर दि. ६ फेब्रुवारी २०२२ ला नेहमीच गोरगरीब जनतेला मोलाची मदत करणारे समाजसेवक रामुशेठ मालपाणी, आमदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, एडओकेट अभिजित देवके यांच्याहस्ते घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे व लवकरच मातंग पुरा रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवासी असणारे गजानन वाघमारे यांना हक्काचे घर बांधून मिळणार आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस सचिव ईश्वर बुंदीले, जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख, महेश बुंदे, ग्रामसेवक राजेश उगले, दत्ता कुंभारकर, डॉ. भूषण कट्टा, इंजि. नितेश वानखडे, नामदेवराव उटाळे, कण्हेया बुंदीले, सीताराम खंडारे, पप्पु मिर्झा, निलेश वानखडे, कल्पेश भैया, नंदू सोमाने आदी उपस्थित होते.
याआधी दर्यापूर तालुक्यातील गायवाडी, तेलखेड, तोंगलाबाद, करतखेड या गावातील गरजू कुटूंबाला दर्यापूरचे रतन टाटा रामुशेठ मालपाणी यांच्या सहकार्याने हक्काचे घर बांधून दिले आहे. भविष्यात आयुष्यभर स्वतःचे घर हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे बांधता आले नाही त्यांना हक्काचा निवारा बांधून देण्याचा संकल्प केला आहे.