Post Views: 429
रोटरी मिडटाउन, सुखांत पॅलिएटिव्ह केअर सेंटर व विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजन
अमरावती – महेश बुंदे
अमरावती वार्ता :- ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, पुस्तकदिनाचे औचित्य साधून २०२१ मध्ये ‘साहित्यिकांचा सन्मान’ हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाउन द्वारा राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत दि. ५ फेब्रुवारी शनिवार रोजी दु. ४ वाजता सुखांत पॅलिएटिव्ह केअर सेंटर व विदर्भ साहित्य संघ, अमरावती यांचे वतीने पी डी एम एम सी येथे साहित्यिकांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री विलास मराठे अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ उपस्थित होते. तर मुख्य अतिथी म्हणून डॉ. शामसुंदर निकम जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अनिल देशमुख अधिष्ठाता, पीडीएमएमसी, डॉ. पद्माकर सोमवंशी डायरेक्टर, पीडीएमएमसी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शोभा रोकडे ज्येष्ठ साहित्यिक, रोटे आनंद दशपुते अध्यक्ष, रोटरीक्लब रोटे डॉ. बबन बेलसरे माजी अध्यक्ष, रोटरी क्लब आदी उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती साहित्यिक राज यावलीकर, अशोक थोरात, डॉ सतीश अग्रवाल, सौ. शोभा काळे
सुनील यावलीकर, नितीन देशमुख, नितीन भट, आर एस तायडे, प्रा.डॉ गजानन हेरोळे, गजानन मते, पवन नालट, प्राची पालकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन रोटे डॉ. विनायक कडू (अध्यक्ष २०२०-२१), रोटे डॉ. सतीश अग्रवाल ( सचिव), रोटे आशीष गाताडे (सचिव), रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाउन २०२०-२१ व विदर्भ साहित्य संघ,शाखा-अमरावती यांच्या वतीने करण्यात आले होते.