दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर ते अंजनगाव रोडवर असलेल्या ईटकी फाट्याजवळ चार चाकीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला असून यात दुचाकी व चारचाकी मधील चार जण गंभीर जखमी झाले असून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की आज दिनांक ४ फेब्रुवारी ला सायंकाळी चार वाजून पसतीस मिनिटांनी दर्यापूर येथून एम एच ११ बीके २७५८ ही कार अंजनगाव कडे जात होती. ईटकी फाट्याजवळ या कारचा समोरचा टायर अचानक फुटल्याने सदर कार अनियंत्रित झाली.

यामुळे कारणे उलट्या घेत झाडावर आदळली, यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला या कारने जोरदार धक्का दिला, सदर दुचाकीवर एक दांपत्य येत होते ते दूरवर फेकले गेले, कारने घेतलेल्या फलटणमध्ये कारमधील स्वार एक युवती अपघातात ठार झाली आहे तर दुचाकी व चारचाकी मधील एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
