कारंजा येथे ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-कारंजा येथे दोन वर्षांपासून कोविड 19 कोरोना महामारी ने जनजीवन प्रभावित झालेले आहे अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणचा धोका पाहता कारंजा शहरात या वर्षी १९ ऑक्टोबर रोजी ईद मिलादुन्नबी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संपूर्ण जगभरात विशेषतःभारतात हा उत्सव खूप उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु या वर्षी कोरोना संक्रमण व शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही प्रकारची शोभायात्रा न काढता साजरा करण्यात आला.

ईद मिलाद या दिवसाला ईद मिलाद उन नबी तसेच बारावफात ही म्हटले जाते. या वर्षी २०२१ मध्ये ईद मिलाद उन नबी संपुर्ण भारतात १९ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.
पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन अथवा जन्म उत्सव ईद-ए-मिलाद-उन-नबी म्हणून साजरा करण्यात येतो.मिलाद उन नबी एक असा उत्सव आहे जो इस्लाम धर्माला मानणाऱ्यांना खूप महत्वपूर्ण आहे. इस्लामिक कैलेंडर अनुसार तिसऱ्या महिन्यात रबी अल अव्वल ची सुरुवात झालेली आहे.या महिन्यातच्या १२ तारखेला अंतिम पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला. पैगम्बर हजरत मोहम्मद संपुर्ण विश्वातील मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान आहे म्हणून पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस ईद मिलाद उन नबी मुस्लिम समाज बांधवांसाठी महत्वपूर्ण आहे. जगभरात विशेषतः भारतीय उपमहाद्वीप मध्ये हा दिवस खूप उत्सवात साजरा केला जातो या दिवसालाच ईद मिलाद उन नबी किंवा बारावफात म्हणून ओळखले जाते.


मक्का येथे जन्मलेले पैगंबर मोहम्मद साहेब यांचे पूर्ण नाव पैगंबर हज़रत मोहम्मद तथा त्यांच्या आईचे नाव अमीना बीबी व वडिलांचे नाव अब्दुल्लाह आहे. पैगंबर हजरत मोहम्मद ज्यांना अल्लाहने सर्वात प्रथम पवित्र कुरान प्रदान केला. त्यानंतर पैगंबर साहेब यांनी पवित्र कुरान चा संदेश जन-जन पर्यन्त पाठविण्याचे कार्य केले. पपैगंबर हजरत मोहम्मद यांचा उपदेश मानवतेला मानणाऱ्या साठी महान आहे.ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या पर्वावर रात्री पवित्र कुराण पठण करून प्रार्थना केली जाते. तसेच शोभायात्रा काढण्यात येते परंतु या वर्षी कोरोना काल पाहता ईद मिलादुन्नबीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. या महत्वपूर्ण प्रसंगी कोरोना काल तथा शासन निर्देशानुसार ईद मिलादुन्नबी चा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करून शहरातील बहुसंख्य ठिकाणी लंगर चे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी एकमेकांना भेटून मंगलमय शुभेच्छा देऊन शांतता ,अखंडता आणि एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली. ईद मिलादुन्नबी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करून शासन नियलावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन हाजी मो युसुफसेठ पूंजानी तथा जुलूस उत्सव समिति पदाधिकारी,नगीना मस्जिद चे इमाम हाफिज सय्यद अहमद,जामा मस्जिद इमाम मुफ़्ती अ मजित आदिने केले होते. या पवित्र उत्सवा निमित्त शहरात विभिन्न ठिकाणी कोरोना नियमावली चे पालन करून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तसेच सामान्य वर्ग नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ईद ए मिलाद निमित्ताने हेलपिंग हँडस ग्रुप द्वारा स्थानीय अनवार गर्ल्स उर्दू हायस्कूल येथे हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांनी निशुल्क मेडिकल चेकअप कॅम्प चे उदघाटन केले आयोजित कॅम्प मध्ये गरजूंना मेडिकल चेकउप करून निशुल्क औषधी उपलब्ध करून देण्यात आली करण्यात आली यावेळी डॉ मोहसीन खान,डॉ मुजमिल खान,डॉ शकील मिर्झा,नगरसेवक झाकीर शेख,नगरसेवक सै मुजाहिद,राजुभाई,बरकत ठेकेदार आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!