गुरु आराधनेनिमित्त वळली भक्तांची पाऊले पोहरादेवी कडे, संत डॉ. रामराव बापूजींच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य
प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-मानोरा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे मागील वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या पावन दिनी अंतिम संस्कार करण्यात आलेले संत डॉ. रामराव महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीला जगभरातील भक्त गणांचे पाऊले अगाध श्रद्धेपोटी गुरु आराधना दिनानिमित्त पोहरादेवीकडे वळलेली आहेत.
