Post Views: 662
प्रतिनिधी फुलचंद भगत
मंगरुळपीर पो.स्टे.ला ठाणेदार श्री.सुनिल हूड रुजू
वाशिम वार्ता:-पंचक्रोशीत नावाजलेले आणी सर्वधर्मसमभाव जोपासणारे शहर म्हणून ओळख असलेल्या संत बिरबलनाथ महाराज तसेच साडेतिन कलंदपैकी एक कलंदर असलेल्या दादा हयात कलंदर यांची वस्ती म्हणून नावलौकीक असलेल्या मंगरुळपीर ला कर्तव्यदक्ष म्हणून आपल्या कार्यप्रणालिने ठसा ऊमटवणारे श्री.सुनिल पांडुरंगपंत हूड हे पो.स्टे.ला ठाणेदार म्हणून रुजु झाले आहेत.याआधी ते पोलीस कल्याण शाखा वाशिम येथे कार्यरत होते.
मंगरूळपीर ही शांत नगरी,नाथ पिरांची वस्ती असलेले हे गाव.सर्व जातीधर्माचे लोक एकमेकांच्या सणऊत्सवात हिररीने सहभाग घेवून गुण्यागोविंदाने या मंगरूळपीरला वास्तव्य करतात.ऐतिहासिक पार्श्वभुमी असलेले हे गाव तसे शांत असले तरी माञ इथे काही प्रवृत्ती डोके वर काढतात.यामध्ये अवैध धंदे असो,राशन तस्करी,रेती तस्करी,गुटका तस्करी सोबतच गांजा पिणारेही अधुनमधुन दृष्टीपथास पडत असल्याने गांजाचीची बाहेरुन इथे तस्करी असल्याची संभवना आहे.याआधी मंगरुळपीरला मोजके ठाणेदारांचा वादग्रस्त कालावधी सोडल्यास सर्व ठाणेदारांनी मोलाची भुमिका जोपासुन आपल्या कुशल कार्यप्रणालीमुळे या नगरीत नेहमी शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे सदैव काम केले आणी या पोलिसांच्या चांगल्या कार्यशैलीनेच येथील नागरिक गुण्यागोविंदाने आणी मोकळ्या मनाने श्वास घेतात हे तितकेच खरे.वाइट प्रवृत्तिचा नायनाट आणी अवैध धंदे हद्दपार करुन चांगल्या माणसांच्या रक्षणासाठी आणी तालूक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्वाची भूमिका पोलिस प्रशासनावर असते आणी ती पेलण्याची ताकदही पोलिस प्रशासन नेहमी करत असतात.तेवढ्याच ताकदीचे आपल्या पारदर्शक आणी दबंग कारवाईने गुंडांना सळो की पळो करुन सोडणारे आणी अवैध धंदे हद्दपार करणारे ठाणेदार श्री.सुनिल हुड हे नुकतेच मंगरुळपीर पो.स्टे.ला ठाणेदार म्हणून रुजु झाले.
श्री.हुड साहेब हे याआधी खामगाव याठिकाणी कर्तव्यावर होते तर मुळचे ते अमरावती जिल्ह्यातील आहेत असे कळले.खामगाव सारख्या संवेदनशिल ठिकाणी कर्तव्य बजावणारे ठाणेदार सुनिल हूड हे मंगरुळपीर तालुक्यातही कायदा अबाधित राखुन शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित जरुर करतील अशी मंगरुळपीरवाशीयांना आशा आहे.वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी महाराष्ट पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम २२ एन (२) मधील तरतुदीप्रमाणे वाशिम जिल्हा पोलिस आस्थापना मंडळ यांची बैठक दि.३१ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाली. पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना देण्यात आली.यानुसार मंगरूळपीर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक म्हणुन सुनील पांडुरंगपंत हुड यांची नियुक्ती करण्यात आली.
अमरावती येथील रहिवासी तथा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे कार्यरत व उत्कृष्ट कामगिरी करणारे, दबंग ठाणेदार, सुनील हुड यांची मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदि नियुक्ती करण्यात आली असुन,गुन्हेगारी सह अवैध्य व्यवसाय, यांचा समुळ नायनाट करण्याच्या तालुका वाशीयांच्या आशा आता पल्लवितत झाल्या आहेत तर नव्यानेच रुजु झालेले ठाणेदार आपली कामगीरी कशा पद्धतीने पार पाडतात या कडे जनतेचे लक्ष लागुन राहणार आहे.