चिंबळी दि३०( वार्ताहर – सुनील बटवाल) पंचायत समिती खेड यांच्या वतीने कुरुळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान सन२०२१/२२ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्याचे थिमेटीक ट्रेनिंग (बोर्ड) मेंबर या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचा सुभारभ सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले.

यावेळी सचिन शेवाळे अशोक मोहिते एस एस साळूंके कुरुळी मोई परिसरातील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात खेड तालुक्यातील ३० गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांना आपलीं जबाबदारी काय आहे ग्रामसभा मासिक सभा महिला सभा याचे महत्त्व काय आहे व गावपातळीवर सामाजिक समस्या व सोडवणूक कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

या मध्ये कुरुळी मोई नाणेकरवाडी म्हाळुंगे सागुर्डी रासे भोसे चिंबळी केळगाव चल्होली खु धानोरे मरकळ गोलेगाव कोयाळी कान्हेवाडी मेदनकर वाडी वाकी खु चिंचोशी दावडी सावरदरी वासुली शिंदे वराळे किवळे निमगाव रेड्डी वेताळे कन्हेरसर वेताळे चांडोली दोंदे या गावांचा समावेश असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी एस एस साळूंके यांनी दिली.
