Post Views: 394
कनिष्ठ महाविद्यालयात मंगरूळपीरला केले आहे अध्यापनाचे कार्य
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील दाभा निवासी लक्ष्मण रमेश जाधव यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या राज्य अधिव्याख्याता पात्रता परीक्षा (सेट)उत्तीर्ण केली आहे.
श्री जाधव यांचे प्राथमिक शिक्षण दाभ्याला तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंगरुळपीर शहरात झाले. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले असून राज्यशास्त्र विषयातच त्यांनी राज्य अधिव्याख्याता पात्रता परीक्षेत यश मिळविले आहे. श्री लक्ष्मण जाधव है संस्कृती विषयात पदवीधर असून राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. मंगरूळपीर मधील सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केलेले आहे. सध्या संस्कृत शिक्षक म्हणून जाधव कार्यरत आहेत.
आपल्या यशाचे श्रेय वर्धा येथील महात्मा गांधी विद्यापीठातील मार्गदर्शक डॉ. भारत कुमार तथा मंगरुळपीर येथील सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील निवृत्त प्राचार्य वाय. एस. आगाशे डॉ सुनील राठोड यांना देतात.