अपघात की घातपात? अखेर ‘त्या’चिमूकल्या मुलाचा मृतदेह ऊकरुन मृत्युनिश्चीतीसाठी लॅबला पाठवले नमुने

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात असलेल्या तर्‍हाळा नजीक दोन महिन्यापुर्वी दफण केलेल्या त्या चिमुकल्या मुलाचे प्रेत अखेर ऊकरुन पोलीस,डाॅक्टर आणी महसुल प्रशासनाच्या ऊपस्थितीत नमुने घेवुन फाॅरेन्सिक लॅबला पाठवल्याचे समजले.सदर प्रकरणात त्या बालकाचा अपघात की घातपात याकडे पुढील चौकशीअंती कळणार आहे याकडे संपुर्ण जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

वाशिमच्या तऱ्हाळा भागात 4 वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू झाला होता मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत शेलू बाजार इथे राहणारे लांभाडे या व्यक्तीने केला.जादूटोन्या व काळी जादूटोणाच्या उद्देशाने वाशिम जिल्हापरिषदेच्या एक सदस्या आणि त्यांच्या पतीसह सहकाऱ्याने मिळून नरबळी तुन हत्या केल्याची तक्रार 6 डिसेंम्बर रोजी केल्या नंतर प्रशासनाच्या आदेशाने दिनांक २९ जानेवारी रोजी त्या बालकाचे प्रेत दफनभूमीतून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले.

महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि आरोग्य प्रशासनच्या संयुक्त पथक या मध्ये सहभागी होते.त्या 4 वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू झाला होता असे समजते.सदर बालक हा उत्तर प्रदेश च्या मिरझापुर च असल्याचं कळते मात्र नेमक प्रकरण काय? हत्या की अपघात शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर घडलेल्या घटनेचे गूढ उघडणार आहे .त्या अहवाला कडे जिल्ह्यातील नागरिकाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!