महिलांना निर्भयत्व प्रदान करणारे निर्भया पथक

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-कोविडच्या कारणामुळे बऱ्याच दिवसापासुन बंद असणारे शाळा,महाविदयालये सुरू होत आहे.
याच पार्श्वभुमीवर आज दिनांक २०.१०.२०२१ ला मा.पोलीस अधिक्षक साहेब,वाशिम यांनी पोलीस
अधिक्षक कार्यालय,वाशिम येथे वाशिम जिल्हयातील शाळा, महाविदयालयातील मुख्याध्यापक यांची सभा आयोजीत केली होती.

या सभेमध्ये मा.पोलीस अधिक्षक साहेब,वाशिम यांनी मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनीधी यांचा परिचय करून घेवुन समाजात शाळा, महविदयालयामध्ये वावरतांना महिला किंवा विदयार्थिनींना काय अडचणी येतात याबाबत माहिती घेतली.

तसेच शाळा स्तरावर हया अडचणी दुर करण्यासाठी काय
उपाययोजना केल्या आहेत हे सुध्दा जाणुन घेतले मुख्याध्यापक यांच्या समस्या जाणुन घेवुन त्यावर
उपाययोजना म्हणुन वाशिम शहरात मुली व महिला यांच्या संरक्षणार्थ तैनात असलेले ‘निर्भया’ पथक येत्या
काही दिवसामध्ये वाशिम जिल्हयातील तालुका स्तरावर व सर्व पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत करणार असले
बाबत सांगितले.

या पथकामार्फत शाळा महाविदयालये, कोचिंग क्लासेस,वसतीगृह येथील विदयार्थिनींशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न निर्भया पथक जाणुन घेवुन त्यांवर योग्य त्या उपाययोजना करतील तसेच निर्भया पथक गर्दीच्या ठिकाणी सतत पेट्रोलींग ठेवण्यात येईल कोणी गैरकृत्य करत असल्यास त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

निर्भया पथकाच्या वतीने शाळा महाविदयालय येथे महिलवर होणारे अत्याचार व त्यांचे कायदे विषयक अधिकाराची जनजागृती कार्यक्रम तसेच मुली व
महिलांना स्वरक्षणाचे धडे देण्याबाबतचे कार्यशाळा आयोजीत केल्या जातील.

महिला/विदयाथिंची कोणी छेड काढत असेल किंवा त्या संदर्भात कुठलीही तकार असल्यास निर्भया पथक,वाशिम च्या पोलीस
हेल्पलाईन क्रमांक ११२, नियंत्रण कक्ष,वाशिम फोन नंबर:- ०७२५२२३४८३४,८६०५८७८२५४ या कमांकावर संपर्क करण्याबाबत मार्गदर्शन केले.सदर सभेस मा.पोलीस अधिक्षक सा,वाशिम, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे,शाखा, वाशिम, सहा.पो.नि इंगळे स्था गु.शा, पोउपनि. अश्विनी धोंडगे, निर्भया पथक, वाशिम, जिल्हयातील
शाळा,महाविदयालयांचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी, इ.हजर होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!