दर्यापूर – महेश बुंदे
कोकर्डा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौ. पुष्पा ज्ञानेश्वर बारब्दे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोकर्डा येथील मुख्य चौकात झेंडावंदन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सौ. पुष्पा बारब्दे हे होते. त्याचबरोबर उपसरपंच राजू सोळंके, माजी सरपंच श्रीकृष्ण सावरकर, मनोहर माहोरे, ज्ञानेश्वर बारब्दे, निवृत्ती बारब्दे, उद्धव बारब्दे, नितीन सावरकर, संजय गव्हाळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व व जिल्हा परिषद शिक्षक वृंद, विविध क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते,

त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले, सदर कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पाटील सावरकर यांनी केले, त्यानंतर खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
