गाडगेबाबांना जाऊन आज ६५ वर्ष झाले तरीही त्यांनी दशसुत्री कलमाद्वारे सुरू केलेले कार्य आजही सुरू असून महाराष्ट्रातील बाबांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन दर्यापूर शहर काँग्रेस माजी अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ईश्वर बुंदिले यांनी केले ते श्री संत गाडगे महाराज बालगृह येथे ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.
सुरुवातीला गाडगे बाबांचे आवडते भजन द्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. महेंद्र पाटील भांडे, दत्ता पाटील कुंभारकर, असलम मंसूरी, विठ्ठल पाटील भांडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थित सर्व मुलांना आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते चॉकलेट तथा नाश्ता व वाटप करण्यात आला. कोरोना काळात शासनाच्या त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करून ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरभ रहाटे यांनी तर आभार अधीक्षक रितेश देशमुख यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी राजूभाऊ गुल्हाने, ठाणेदार प्रथमेश आत्राम, घाणीवाला ब्रदर्सचे संचालक फारूक शेठ, सिद्दिक भाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.