दापोली,खेड व मंडणगड तालुक्यातील पोलीस स्टेशनला मिळणार नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारती ; आमदार योगश कदम

रत्नागिरी प्रतिनिधी:- दापोली खेड व मंडणगड तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या नवीन अद्ययावत प्रशासकीय इमारतींसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी मंजुरी दिल्याची माहीती आमदार योगेश कदम यांनी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्र्यांकडे आपण आमदार झाल्यानंतर या ही या पोलीस स्थानकांच्या प्रशासकीय इमारती व पोलीस कर्मचारी वसाहतींच्या बांधकामासाठी भेट घेऊन पत्र देऊन पाठपुरावा केला होता यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनीही प्रस्ताव दिला होता त्याला आता मंजुरी मिळाली असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करुन यावर निर्णय होऊन ही अंतिम मंजूर झाली आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली खेड व मंडणगड चा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकूण ८७ पोलीस स्थानकांची नुतन इमारत कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. खेड येथील पोलीस स्थानकाची इमारत ब्रिटिशकालीन असून १९०६ मध्ये बांधण्यात आली होती.

राज्य सरकारने ठरवलेल्या धोरणानुसार प्राधान्य क्रम यादीत पोलीस स्थानक प्रशासकीय इमारती ज्या जीर्ण झाल्या आहेत त्या नव्याने बांधल्या जाणार अहेत. रत्नागिरी जिल्हयात आपल्या विधानसभा मतदारसंघातील दापोली खेड व मंडणगड पोलिस स्थानकाच्या नवीन प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाकरता मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्राधान्य यादीत याचा समावेश करण्यात आला आहे. कर्मचारी वसाहत व प्रशासकीय इमारत या दोन्हीसाठी आपण व रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र देऊन पाठपुरावा केला होता अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली. यासाठीचे अंदाजपत्रक प्लान आदि तांत्रिक बाजूंची पूर्तता करून लवकरच पुढील काम सुरु होईल यासाठी आपण पाठपुरावा करू असेही आमदार योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

दापोली,खेड,मंडणगड तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी चांगली निवासस्थाने आवश्यक असुन आता असलेली व्यवस्था व यामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या याची आपल्याला जाणीव आहे. यासाठीही माझा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली. लवकरच पोलीस वसाहतींचे बांधकाम आवश्यक असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता १९०६ ब्रिटिशकालीन असलेल्या खेड पोलीस स्थानकाचे रुपडेही आता पालटणार आहे. महाराष्ट्रात केवळ ८७ स्थानकांना मंजुरी मिळाली असुन यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील चार पोलिसांचा समावेश आहे. राजापूर पोलीस स्थानकाचाही समावेश या यादीत आहे. माझे आजोबाही पोलीस खात्यात होते. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे वडील पोलीस खात्यात होते त्यामुळे आमच्या कुटुंबाच नाते जवळच आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची दुःख आपण समजू शकतो त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांजवळ माझीही कौटुंबिक बांधीलकी असल्याची आठवण त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!